ऑनलाइन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित नकाे : मासूची मागणी

मिलिंद जाधव,

ठाणे प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्यसरकार ने पुर्व प्राथमिक व उच्च माध्यमिक पर्यत शाळा सुरु करण्याचा विचार करत असुन या विषयांला अनुसरुन महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु )या अराजकीय विद्यार्थी संघटनेकडुन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना ऑनलाइन ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आलं आहे.


महाराष्ट्रातल्या सरकारी शाळा,किंवा सरकारी अनुदानावर चालणाऱ्या शाळा यांचा विचार केला तर या शाळांमधील जवळपास सर्वच विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असतात आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाकीची असते .कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपण जे निर्णय घेतले आहेत की जेथे कोरोना बाधित रुग्ण कमी आहेत किंवा नाहीत अशा ठिकाणी शाळा सुरु करायचा हा निर्णय विद्यार्थी हिताचा अजिबात नाही.जर दुदैवाने कोरोनाची लागण एका शाळेतील एका विद्यार्थ्यांना झाली तरी संपुर्ण विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होऊ शकते,म्हणून आपण विद्यार्थ्यांचा जीवाशी खेळू नये असे मासूचे उपाध्यक्ष सुनिल देवरे यांनी सांगितले.


महाराष्ट्रांतील ग्रामीण भाग असो वा शहरी काही अपवाद वगळता सरकारी शाळा आणि अनुदानित शाळा यांचा शिक्षणाचा दर्जा हा नियोजित पद्धतीने ढासळवण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सरकारी शाळा असो वा शहरी तेथे मजुरांची आणि अत्यंत गरीब कुटुंबातील मुलाचं शिक्षण घेतात.म्हणुन आँनलाइन शिक्षण घेणे त्यांना शक्यच होणार नाही. अशी मासुने निवेदनात म्हटले आहे.


आपल्या संविधानाने शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे असे सागितले आहे. म्हणुन आम्ही महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन ( मासु ) असे शालेय शिक्षणमंत्री यांना मागणी करीत आहोत की महाराष्ट्राच भविष्य हेच विद्यार्थी आहेत म्हणुन त्यांचे माय-बाप बनुन आपण त्यांना ऑनलाइन शिक्षणासाठी संपुर्ण यंत्रणा मोफत उपलब्ध करुन द्यावे असे मासूचे राज्य सहसचिव प्रशांत जाधव यांनी बोलताना सांगितले.


ठाणे प्रतिनिधी आपण प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तम दर्जाचे मोफत टँब वितरित करावे आणि त्यामध्ये आँफलाइन लेक्चर लोड करावेत,प्रत्येक शाळेत टोल फ्री क्रमांक असावा आणि त्यावर शिक्षकवर्ग शाळेच्या वेळेत तेथे त्या क्रमांकावर हजर राहतील अशी सुविधा करावी,जेणेकरुन विद्यार्थ्याना काही प्रश्न किंवा अडचणी असतील तर त्यावरुन त्यांचे निरसन केले जाईल.आँफलाइन लेक्चर कसं असावं याचं रेकाँडींग डेमो म्हणुन ( मासु ) आपणांस देईल त्यासाठी आपण आपल्या बहुमुल्य वेळ द्यावा अशी विनंती आणि मागणी मासु ने निवेदनात केली आहे. SUpport

Independent Journalism

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved