मासिक धर्म


By माधुरी वसंतशोभा/ Madhuri Vasantshobha


आज २८ मे. मासिक पाळी स्वच्छता दिन.

सृजनाची ताकत असलेली स्त्रीला मासिक पाळीच्या दिवशी 'विटाळ' आहे असं समजून आजही अस्पृश्य वागणूक दिली जाते. ९०० वर्षापूर्वी विटाळ झुगारणारा महापुरुष आपल्याकडे होऊन गेला- 'महात्मा बसवण्णा'.

विटाळ झुगारणारे संवेदनशील मन तयार होणं गरजेचं आहे.

-कवी कबीर बोबडेती म्हणाली,


" मासिक पाळीचाच घेतला असता धर्म जाणून तर...


माणसा माणसात भेद करून विटाळ मानणाऱ्या प्रत्तेक धर्माला केला असता मी प्रवेश निषिद्ध गाववेशीवरच


रक्त म्हणजेच सृजन,सृजन म्हणजेच क्रांती

हे तत्वज्ञानही घेता आले असते समजून


मग.....


नवसृजन करणाऱ्या माझ्या मासिक पाळीनच रंगवला असता मी माझा प्रदेश


आणि...

त्याच मासिक पाळीच्या रक्तानी न्हावु घातलं असतं माणसानी निर्माण केलेल्या ईश्वराला कायमचा विटाळमुक्त करण्यासाठी

...डार्विन चा सिंद्धांत सांगत.


माझ्या पाळीच्या रक्तातील थेंबाथेंबात मला दिसतो फक्त आणि फक्त उत्क्रांत होत गेलेला माणूस."


-माधुरी वसंतशोभा

कवियत्री

शिक्षिका नागपूर

सावित्री फ़ातिमा संस्कृती संगती नागपूर या संस्थेच्या सचिव.

अधांतरी हा काव्यसंग्रह प्रकाशित.

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn