"निरंतर सुरू असा परतीचा प्रवास"...

By शिवानी कांचन गंगाधर"निरंतर सुरू असा परतीचा प्रवास"... कामाच्या शोधात गर्दीच्या शहरात आम्ही विसरलोत स्वःताला.. कष्टाची भाकर आणि सुखाचा संसार थाटायचे स्वप्न उराशी घेवून शिरलो होतो शहरात.. आज उराशी आकाश एवढंच काय उरलय परतीच्या प्रवासात.. कामाच्या शोधात गर्दीच्या शहरात आम्ही विसरलोत स्वतःला.. दारिद्रयाने घातलेलं थैमान, कर्जाच अर्थसंकट, अस्थायी उदरनिर्वाह.. तान्हलेल्या पोराचं आसुसलेला चेहरा, अन् उपाशी मायबापाच्या जबाबदारीस्तोवर झालोत कधी बांधकाम मजूर तर कधी कारखान मजूर विना विरह.. परंतू आज हाती असलेलं सार जोडूनही अशक्य झालाय परतीचा प्रवास..     कामाच्या शोधात गर्दीच्या शहरात विसरलोत स्वतःला.. तेव्हाही जगण कठीणच, परंतु आज ते नपरवडणार असच.. लेकरांना छातीशी घेवून लांब अंतर ठरवलय पायदडी तुडवायच.. जगण सोप नाही आणि त्याची किंमत व मोजमाप ही आकडेवारीतच असल्याने, मृत्यूस मार्ग मोकळा आहे या परतीच्या प्रवासात.. कामाच्या शोधात गर्दीच्या शहरात आम्ही विसरलोत स्वतःला.. प्रसंगी ओळखपत्रही आता चालेणास झालंय आणि लक्षात आलय त्याची किंमत होतीय ती निवडणूकी दरम्यानच.. उमगलंय लोकशाही नेस्तनाबूत झाल्याच आणि चित्र समोर आहे सत्ताधाऱ्यांच्या राजेशाहीच.. शरीराने दमलेलो आणि मनाने हरलेलो असलोत तरी आशा होती उद्याच्या प्रकाशमयी पहाटेची, परंतू तेवढ्यातच कळलंय भुकेन व्याकूळ कुणीतरी आपल्यातलं गमावल्याचं.. आता जगायचंय, या जिद्दीवरतीच उद्याचा परतीचा प्रवास.. कामाच्या शोधात गर्दीच्या शहरात आम्ही विसरलोत स्वतःला.. आमच्या आया-बहिणींच्या शोषणाला जबाबदार हा सभ्य समाज.. शेवटी आमचे कितीतरी जीव बळी गेलेत या समाजाच्या विकृत माणसिकतेत..  आता अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारून शोध घेवू कोण यास कारणीभूत.. आज केवळ सभ्य समाजाच्या व न्यायाच्या कल्पनेतच हा चाललेला परतीचा प्रवास..   कामाच्या शोधात अन गर्दीच्या शहरात आम्ही विसरलोत स्व-अस्मितेस.. आता झोप उघडलीय आणि गुलामीची जाणीव ही झालीय, संपूर्ण शरीर थकलंय परंतू येथील मातीत डाग आमच्या घामाच, कष्टांच नि रक्ताचं.. आता पेटून उठायचंय, माणूस म्हणून जगायचय, स्व-आदर आणि स्वाभिमानाने पुन्हा जिवंत व्हायचय.. या कल्पना उतरल्यात डोळ्यांत नि काळजात आता पाऊल मागे घेण अशक्यच.. सुरु केलाय आम्ही हा शेवटचा स्व-अस्तीत्वासाठीचा परतीचा प्रवास..


शिवानी कांचन गंगाधर/Shivani Kanchan Gangadhar MA in Social Work in Livelihood and Social Entrepreneurship, Tata Institute of Social Sciences, Mumbai.

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn