नाव (Name)

By Vicky Nandgaye
नावात काय ठेवलयं सांगून गेलाय कुणी तरी मोठा फिलोसाॅफर, पण कदाचित तो भारतात जन्माला आला असता तर असं काही बोललाच नसता..


कारण या देशात फक्त व्यक्तीच्या नावाला महत्व दिले जाते.


जगाच्या कुठल्याही कोपर्यात असा देश असेल का हो ?


माझ्या आया-बहिणींची भर चौकात इज्जत काढून, नागडं करून मारलं जातं ..

माझ्या भावांना कधी एका रिंगटोनमुळे, तर कधी त्यांच्या जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे, तर कधी त्यांनी केलेल्या अत्याचारा विरुध्द आवाज उठवल्यामुळे एट्रोसिटीज केल्या जात,


ते फक्त आणि फक्त त्यांच्या नावामुळे!!मला वयात येत असताना, कळायला लागलं कि, माझ्या नावाच्या व्यक्ती का नाही दिसत कुठल्याही दूरदर्शनच्या मालिकेत अथवा एखाद्या चित्रपटात ?

का मला फक्त शर्मा वर्मा जोशी दुबे मेहरा शुक्ला बेदी सक्सेना दिसतायेत ?


आणि का मला माझ्या सभोवताली राहणारे मेश्राम नंदेश्वर वाहने जांभूळकर वालदे डोंगरे सोनपिंपळे हे कधीच तिथे दिसत नाहीत?

तेव्हा माझ्या लक्षात आले कि माझी दुनिया आणि टिव्हीतली दुनिया हि फार वेगळी आहे


पण जेव्हा मी माझ्या समाजातील घडलेल्या घटना ऐकत गेलो..

तेव्हा मला माझ्या रिसर्चच्या प्रश्नाचे उत्तर हे अधिक ज्यास्त कळायल लागले

ती घटना होती भोतमांगे ची, त्यानंतर कित्येकदा मी अश्याच घटना बघत गेलो..

पण त्यामध्ये मात्र माझ्या दुनियेच्या लोकांचा समावेश हा खूप ज्यास्त होता..कारण मला आता मरणाऱ्या लोकांच्या गर्दीत वा यादीत आपली ओळखीची नावे ही ज्यास्त दिसू लागली..

ते होते तुपे, पवार, वाघमारे, शिंदे, बनसोड, जगताप, खोब्रागडे जोंधळे...


हे बघून माझ्या लक्षात आलं कि माझा माणूस मेला कि समाज देखील हा न्यायेच्या मूर्तीसारखा आंधळा होतो.

परंतु त्यांच्या दुनियेचा कुणी मेला तर त्यावर पण २४*७ TRP चा खेळ चालतो..


उलट माझ्या दुनियेतील माणसाचा उल्लेख हा एका प्रादेशिक वर्तमान पत्रात सुद्धा छापलेला नसतो.

पण त्यांच्या न्यायासाठी या जातीवादी मिडियाचा


गल्ली ते दिल्ली चाललेला प्रयत्न न शोधता स्पष्टपणे दिसतो

असं का होत आहे ?


माझ्या दुनियेच्या लोकांच्या जीवनाची किंमत इतकी स्वस्त का!!!

हा फक्त आमच्या नावाचा खेळ आहे काय?


हा फक्त आमच्या नावाचा दोष आहे काय?


तर का इतका मोठा फिलोसाॅफर नावात काय ठेवलयं अस बोलून गेला असेल!!!

खरचं जर नावात काही नसतं ,


तर बुद्ध, फुले, पेरियार, आयांकाली, बिरसा,

आंबेडकरांच्या कल्पनेचे जग हे माझे असते..

नसत्या झाल्या माझ्या देशात, माझ्या दुनियेतील लोकांच्या दर दिवशी तीन कत्तली, चार घरांची जाळफूक आणि तीन महिलांची अब्रू लूट.या देशात जातीच्या गुंडांनी आणि धर्माच्या ठेकेदारांनी माणुसकीला कितीतरी वर्षे मागे ढकलले..

आणि स्वतःचे वर्चस्व हे फक्त ‘नावाचे’ राजकारण करून समाजात अतिशय खोलवर बिंबवले.कारण, खरंच नावात काही नसतं तर ते जग आणि माझे जग हे एक असतं .

आणि फक्त माझ्या दुनियेतील लोकांचा अनुच्छेद १५ नुसार त्यांच्या नावामुळे किंवा धर्म, वंश जात, लिंग, आणि जन्मस्थान यावरून भेदभाव होऊन बळी गेला नसता.इक्विलिटी बीफोर लाॅ (कायद्यासमोर समानता – अनुच्छेद १४) हे सगळ्यांसाठी सारखे असून..

ते फक्त माझ्या भीमाने लिहिलेल्या संविधानात गुदमरून मेलं नसतं .


तर समता, स्वतंत्रता, बंधुता, न्याय आणि जातीचे निर्मुलन असणाऱ्या समाजाचे स्वप्न जे माझ्या भीमाने बुद्धाच्या शिकवणीतून पाहिले होते..

ते माझ्यासाठी एलियन न होता हा समाज एकजुटीने असता.

आणि हा संपूर्ण देश माझ्यासाठी परका नसून मला नेहमी मोकळा


श्वास घेऊ देण्यास सक्षम व प्रयत्नशील असता!!Name


A great philosopher has said..

what is in there in the name ?

But if he had been born in India,

he would not have said such a thing..

Because in this country only the ‘name’ of the person is given importance.


Is there such a country in any corner of the world!!


My mothers and sisters are being beaten to death, paraded naked in the square..

My brothers are tortured because of a ringtone, sometimes because of their love for an upper caste girl, and sometimes because of raising a voice against atrocities done by them..

It is only because of their name !!


While growing up, I started to wonder why my name didn't appear in any television series or Bollywood movie!!!

Why do I only see Sharma, Verma, Joshi, Dubey, Mehra, Shukla, Bedi, Saxena?

And why I never see people living around me like

Meshram, Nandeshwar, Vahane, Jambhulkar, Walde, Dongre, Sonpimple there?

That's when I realized that my world and the Television world are very different.


But when I kept listening to what was happening in my community

Then I began to understand the answers to my research questions more and more..

That incident was Bhotmange's, after that I went to see similar incidents many times..

But the people of my world were very much involved in here..

Because now I could see the names of my acquaintances more in the crowd or list of these dying people,

Tupe, Pawar, Waghmare, Shinde, Bansod, Jagtap, Khobragade, Jondhale..


Seeing this, I realized that when my people die, the society also becomes blind like an idol of justice.

But if someone in ‘their world’ dies, the game of 24 * 7 TRP is played..

On the contrary, no news or no mention of people from my world..

It is not even printed in a regional newspaper.

But for upper castes, this castiest media put efforts to bring justice from street to Delhi are also apparently evident.


Why is this happening !!!

Why is the life of the people of my world so cheap ?


Is this just a so-called game of name?

Is it just our name's fault?


So why would such a great philosopher say, what is there in the name !!!

If there really was no name,

Buddha, Phule, Periyar, Ayankkali, Birsa, Ambedkar's ideas world would be mine.


It wouldn't have happened in my country, the every day three killings, four houses set on fire and three women raped from my community.

In this country, caste goons and contractors of religion have pushed humanity backwards for many years..

and their dominance was only deeply ingrained in the society through 'nominal' politics..

Because, if there really was nothing in the name, then that world and my world would have been one.


And also people in my world wouldn't have been discriminated as per Article 15, because of their name or religion, race, caste, sex, and place of birth..

Equality before Law is the same for everyone and it wouldn't have suffocated just in the Constitution of India written by Babasaheb Ambedkar.


So the dream of a society of equality, freedom, brotherhood, justice and annihilation of caste that my Bhima (Dr. Bhimrao Ambedkar) saw in the teachings of the Buddha would not have been alien to me if this society had been united.

And this whole country would have been no stranger to me.

and they would been able to or trying to let me breathe freely !!


Vicky Nandgaye is a PhD Scholar at School of Management & Labour Studies in Tata Institute of Social Sciences, Mumbai.


 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn