मुंबईची धारावी/DHARAVI OF MUMBAI

By डॉ. सुनील अभिमान अवचार / Dr. Sunil Abhiman Awachar

अजूनही धारावीत जिवंत लोक राहतात? होय राहतात-

फक्त उपाशी पोट भरताहेत फक्त रिकामे खिसे आहेत.

अहंकाराच्या नजरेतील कस्टडीत

फक्त स्त्रियांची अब्रू मळकट कपड्यांसारखी रस्त्यावर वाळत टाकलेली

लहान मुले आहेत बेवारस खेळतात सेकंडहॅण्ड खेळण्यासोबत

तारुण्य रोजगाराची वाट पाहत बसले आहे जुगाराच्या डावांवर


गुदमरणारे श्वास चालले आहेत तंग गल्लीतून

प्रेम वापरले जात आहे कंडोमसारखे मानवीसंबंधांत

महापुरुषांचे पुतळे आहेत दलदलीत फसलेले चौकाचौकांत

येथे शांती करणार आहे डिप्रेशनमध्ये आत्महत्या कोणत्याही क्षणाला


येथे कच्चा माल आहे माणसांच्या विक्रीला ठेवलेला

त्याचा करू शकता वापर मनसोक्त कमी दरांत

तो पोहोचवत उपाशीपोटी तुमच्या लाडक्याजवळ जेवणाचा डबा

तो जाहीर सभेसाठी येईल मोठ्या नेत्याच्या गदीत शक्तीप्रदर्शनात सामील होण्यासाठी

त्याचे आवाहन ऐकेल, टाळ्या वाजवेल

हवे असेल तर बॅनर पकडेल, घोषणा देईल, जयजयकार करेल !


ठेंगण्या झोपड्यांत राहत असला तरी, स्वत:चा जीव मुठीत घेऊन

उंच इमारतीला रंगवण्यासाठी चढेल, रंग लावेल

हे सर्वाचिच आश्रयस्थान आहे, ज्याच्या टायऱ्या घासल्या गेल्या आहेत

ज्यांचे हक्क कॉण्ट्रक्टरकडे हस्तांतरित झालेले


ही नेत्यांच्या खिशातली

ही गुंडांच्या तावडीतली

हो मृत्यूची वाट पाहत असणार्यांची

ही सवर्णांच्या तुच्छतेची

ही तुंबलेल्या गटारांची

ही थकलेल्या खांद्यांची खाली दुकान उपर मकान धारावी गरिबाचा ताजमहल धारावी, इबादतची जागाही धारावी धारावी रियालिटी टूरिझम : प्रारंभ माहिम ते शेवट कुंभारवाडा येतात लोक जर्मनी, ऑस्ट्रिया, कॅनडातून वगैरे वगैरे सैलानी म्हणून घेतात गरिबाचा जायका गरिबांच्या चेहर्यांचा मोठा बाजार हे सैलानी पाहून म्हणतात, गरिबी पाहून अश्रू येतात, मी तसा नाही थँक गॉड! येथे जीवन रात्रंदिवस घोड्यासारखे दौड़त आहे या दौडीत आहे बिहारी, युपी, कर्नाटकी इत्यादी धारावीचा विकास सुरू जमिनीवर डोळा सर्वांचा आहे सडक- जैसे थे नाले- सडलेले कुजके उंच इमारती- तकदीर धारावीच्या माणसाचे हृदय चिमूटभर नाही ते आहे सुपाएवढे

-येथे स्लम डॉग राहतात तुम्हावर ते भुंकणार नाहीत!

डॉ. सुनील अभिमान अवचार हे समकालीन आंबेडकरवादी महत्वाचे कवी-चित्रकार म्हणून परिचित आहेत. मुंबई विद्यापीठ मुंबई मराठी विभागात प्राध्यापक आहेत त्यांचे प्रकाशित कवितासंग्रह 'ग्लोबल वर्तमानाच्या कविता' (२००२), 'मी महासत्तेच्यादाराशी कटोरा घेऊन उभा राहणार नाही!' 'ब्राब्हो!फॉक्स माइन्ड्स ऑफ कॅपिटॅलिस्ट्स (२०१०), पोएम ऑफ दी ऑक्युपाय एव्हरीथिंग' (२०१२). केंद्र हरवत चाललेल्या वर्तुळाचा परीघ'(2016) याच बरोबर इंग्रजी अनुवाद Our WORLD is not for SALE (2010), We, the Rejected People of India(2019) इत्यादी विविध विद्यपीठात त्यांच्या कविता अभ्यासक्रमात असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चा सत्रात त्यांनी शोधनिबंध वाचले आहेत त्यांची कविता आणि चित्राच्या माध्यमातून जात, वर्ग, लिंगभेद, LGBT च्यासाठी महत्वाची भूमिका घेत आहे.नुकताच ते काढत असलेल्या कोरोना कोविड19 च्या लढाईतील चित्र दलित, आदिवासी, भटके विमुक्त स्त्रिया यांचा प्रखर आवाज होत आहेत.ENGLISH TRANSLATION by Yogesh Maitreya


Are the people of Dharavi still alive? Yes, they are

They feed their empty stomachs

With their empty pockets,

Into the custody within the sight of vanity

The chastity of women is laid out for drying

Like a dusty cloth along the roadside.

There are children, playing

With the second-hand toys like orphans,

Youngsters are sitting at the gambling dens

Waiting for employment opportunities


Suffocating breaths are inhaled through narrow alleys,

In human affairs love is being used like a condom,

The statues of great men are stuck into swamps

At every traffic signal,

At any moment here

Peace will commit suicide

Out of depression


Raw material is available here

For purchase by human beings,

At a cheap rate anybody can buy it and use it He, with an empty stomach,

Delivers the lunch box to anybody's loving son,

He'll come to attend the meeting

Of a prominent politician and

Merge with the crowd to increase its strength

He'll listen to the promises

He'll applaud

If needed, he'll hold the banner 

He'll shout the slogans

Hell shout victory for this politician


Although he is living in the shorter shack

Hell climb up to colour the skyscrapers towers

He'll risk his life to colour that tower

It is an asylum for everybody:

From whose tyre-made chappals are rotten'

To Whose rights are transferred to the contractors.'

It is in the pockets of politicians

It is in the custody of hooligans

It belongs to those who are waiting for death

It manifests the ugliness of Savarnas and their contempt

In it there are gutters which are overflowing

Its shoulders are exhausted now,

On its ground floors there are shops

On its top, there are homes,

It is the Taj-Mahal of the poor and

It is also a place of worship


Dharavi Reality Tourism:

From Mahim to the end of Kumbharvada

People come here as tourists

From Germany, Australia, Canada, etc.

They taste the lives of the poor

Looking at the market spread across the face

Of the poor,

These tourists say, 'l feel like crying looking at poverty.

Thank God! I am not like this.'


Throughout day and night

Lite here runs like a horse,

People from Uttar Pradesh

From Bihar

From Karnataka, etc. are running

The development in Dharavi is taking shape

A few are keeping an eye over the land

Roads- as they were

Gutters- rotten

High towers- lucky


The heart of men in Dharavi isn't pinch-size

For them, only the sky is the limit


Here, slumdogs live

But they won't bark at you...


Dr. Sunil Abhiman Awachar is an Ambedkarite artist and professor of Marathi literature at Mumbai University.

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn