कुर्ला येथे आरोग्य तपासणी शिबिर

ठाणे प्रतिनिधी 

मिलिंद जाधव


मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून. मागास वस्त्यांमध्ये कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव  केला असून पावसाळा सुरू झाल्याने आणखी चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच आरोग्य यंत्रणेवरचा देखील ताण वाढला आहे. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीर धम्मदीप बुद्ध, साबळे नगर  विहार, रेल्वे कॉलनी जवळ कुर्ला (पुर्व) या ठिकाणी नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


सदर शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  शिबिरात जवळपास २५० नागरीकांनी  उपस्थिती दर्शविली होती. शिबीरामध्ये महिला, व ज्येष्ठ नागरीकांची उल्लेखनिय उपस्थित होती तसेच सदर शिबिर शासनाने आखून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करुन घेण्यात आले. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबिरार्थीची मोफत आरोग्य तपासाणी करण्यात आली. शिबिरात खास करुन ताप, सर्दी, खोकला, ताप, डेंगू आणि मलेरिया आदींची तपासणी करण्यात आली तसेच तज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले.  कोरोना पार्श्वभूमीवर नागरीकांना निरोगी आणि सशक्त जीवन जगता यावे म्हणून अशा प्रकारचे आरोग्य शिबिर वंचित बहुजन आघाडी मार्फत महाराष्ट्रभर आयोजित करण्यात येत आहेत. स्थानिक नागरीकांचे आरोग्य राहणीमान उंचविण्याच्या उद्देशाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 SUpport

Independent Journalism

 Support Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved