वैवाहिक संबंध आणि सहमती

By प्रणाली लांजेवार/Pranali Lanjewar


लैंगिक संबंधासारखी नाजूक, आनंददायी गोष्ट एकमेकांच्या सहमतीनेच हवी तरच ती सुखकारक असते. जबरदस्ती, नवरेपणाचा मूलभूत हक्क इत्यादी गोष्टी त्यात आल्या, की नुसताच शारीरिक त्रास होत नाही तर नात्यातही गुंता होऊ शकतो. मने दुरावतात. म्हणूनच नवरा आणि बायको यांच्यातही या विषयावर चर्चा हवी. एकमेकांना समजून घेणं हवं, तरच नातं कायम टिकून राहील.


महिन्याभरपूर्वी दोघांचं लग्न झालं. दोघेही सुशिक्षित. लग्नाचे सर्व कार्यक्रम आटोपले पण एक महिना झाला तरी ही त्यांचं शारीरिकदृष्ट्या एक होण काही जमत नव्हत. मुलीला खूप त्रास व्हायचा आणि तिला तिच्यावर रेप झाल्यासारखं वाटतंय. लग्नाआधी त्याने कधीच कुणाशी संबंध ठेवले नव्हते आणि आता बायको ही साथ देत नाही. ही माझी लग्नाची बायको, हा रेप कसला. त्यानी काय करावं त्याला कळत नाही.


बाळंतीण होऊन नुकतेच 10-12 दिवस झालेत. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत. कोणता ही त्रास नाही. पण तरी ही डॉक्टरनी सांगितले की डिलिवरी नंतर किमान दीड महिनातरी शारीरिक संबंध नकोत. पण नवरा काही ऐकत नाही.


एक प्रसंग असा ही. गर्भाशय काढण्याची शसत्रक्रिया करावी लागली. वयाच्या ४५ व्या वर्षी खूप रक्तस्राव व्हयाचा. सगळे उपचार करून झाले,पण शेवटी शाष्ट्रकिया करावी लागली. काही दिवसांनी ती आणि नवरा दोघेही डॉक्टरांकडे तपासायला गेले. डॉक्टरनी तपासणी केली त्यांना आहार, व्यायाम सगळे पथ्य पाळायला सांगितले. जाते वेळेस नवरा विचारतो की डॉक्टर ' ते' पथ्य किती दिवस? १० दिवसांनी काही हरकत नाही ना? खरे म्हणजे दोघेही मध्यमवयीन. लग्नाला किती तरी वर्ष उलटुन गेली. तरीही नात्यात लेंगिक समजूतदार पणा दिसत नाहीच.


एकदा वाचलेला प्रसंग फारच निराळा आणि थोड धक्कादायकही. बाई ७० /७२ ची तिचे पती कदाचित ८० वर्षाचा. सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी. बाई मुलीसोबत डॉक्टरांकडे आलेल्या. मुलगी ही वयाचीच. बाईंना योनी मार्गात खूप आग होत होती आणि दुखत पण होते . पांढरा स्त्राव जात होता चालणे ही कठीण झाले होते म्हणून काठीच्या मुलीच्या आधारे दवाखान्यात आलेल्या. तपासणी नंतर डॉक्टरांना अगदी धक्काच बसला. २-३ जखमा त्यांना दिसल्या पण इतक्या वयाच्या बाईला डॉक्टर नी कसं विचारावं हेच समजेना. काही वेळ शांत बसल्यानंतर तीनीच सांगितल की नवऱ्याने बळजबरीने लैंगिक संबंध केल्यामुळे हे असं झालं. ५० वर्ष संसाराला झाली तरी ही हे असं. डॉक्टरांनी उपचार लिहून दिले. पण बाई निराश होऊन म्हणाली की मी या बाबत कुठे तक्रार करावी?


वरील प्रसंग बऱ्याच स्त्रिया अनुभवत असतात.


लैंगिक संबंध ही एक वयक्तिक गोष्ट आहे , यावर चर्चा कोणालाही नको असते. पण जेव्हा ही वयक्तिक गोष्ट एका स्त्री जी एक व्यक्ती आहे शारीरिक त्रासदायक, क्लेशकारक होते आणि ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होतात. विशेषतः प्रजनन आरोग्यावर विपरीत परिणाम होतो तेव्हा ती वयक्तिक गोष्ट राहत नाही आणि राहायला ही नको. पण प्रश्न असा पडतो की याची चर्चा स्त्री कोणाबरोबर करणार ? मैत्रिणीला ही सगळ सांगायला जमतेच अस नाही, मग काय करावं ? डॉक्टरांना सांगणं एक उपाय आहे, पण त्यांना ही सगळ सांगणं जमेल अस नाही, आणि डॉक्टरांचा सल्ला आपला जोडीदार माननार का ? असे अनेक प्रश्न स्त्री समोर असतात.


लैंगिक संबंध सारखी नाजूक आणि आनंदमयी गोष्ट एकमेकांच्या सहमतीने हवी तरच ती सुखकारक असते. जबरदस्ती, नवरेपणाचा मूलभूत हक्क इत्यादी गोष्टी त्यात आल्या, की नुसताच शारीरिक त्रास होत नाही तर नात्यातही गुंता होऊ शकतो. मने दुरावतात. म्हणूनच नवरा आणि बायको यांच्यातही या विषयावर चर्चा हवी. एकमेकांना समजून घेणं हवं, तरच नवरा बायकोचं नातं कायम टिकून राहील.


स्त्रीला ही *नाही* म्हणण्याचा हकक हवा. तो तिला मिळतो का ? माझ्या शरीरावर माझाच अधिकार हवा. ही गोष्ट समाजाने समजायला हवी निदान नवऱ्याने ही समजून घ्यावी.


कायदा करून समस्येची गुंतागुंत होऊ शकते. वैवाहिक आयुष्यही पणाला लागू शकते. मग कुटुंबसंस्थाही कमजोर होऊ शकते. स्त्रियांनाही संसार, कुटुंब, नवरा सर्व काही हवे आहे, पण नवराबायकोचे नाते पारदर्शक, प्रामाणिक, विश्वासाचे, मुख्य म्हणजे सन्मानाचे हवे. एकमेकांविषयी प्रेम तर असतेच, पण त्याबरोबर समंजसपणा, काळजी आणि जपणुकीचे वर्तन हवे. सगळे पुरुष वाईट असतात असं नाही. काही पुरुष खरचं समजूतदार भूमिका घेतात आणि वागतात ही.


मी काही कायदेतज्ज्ञ नाही. थोडीशी सामाजिक जाण असलेली, थोडे फार सामाजिक काम करणारी स्त्री आणि समाजशास्त्र ची विद्यार्थिनी आहे. विषयाची रुची म्हणून सर्व कौटुंबिक, सामाजिक बदल मी उघडय़ा डोळ्यांनी जाणत्या मनाने वाचतेय, बघतेय.  काही किमान गोष्टी पुरुषांनी स्वीकारणे, समजणे आवश्यक आहेत असे मला वाटते. जसे की जेव्हा डॉक्टर सांगतात, इतके दिवस लैंगिक संबंध ठेवू नका तेव्हा ते बंधन, पथ्य पाळायलाच पाहिजे. छोटय़ा शस्त्रक्रियतेनंतर, मोठय़ा शस्त्रक्रियतेनंतर, प्रसूतीनंतर, पाळीमध्ये संबंध नकोच, त्यामुळे स्त्रीच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. मनावरही ओरखडे, चरे उठतात याचीही जाणीव हवी.


आपल्या मैत्रिणींनीही थोडेसे धीट व्हायला हवे. लैंगिक संबंधाबाबतीतील मौन सोडायला हवे. त्यावर समजूतीने चर्चा, विचारविनिमय करावा आणि या गोष्टीचा योग्य तऱ्हेने मुलांवर वेळीच संस्कार करायला हवा. स्त्री शरीराविषयी आदर आणि जबाबदारीची जाणीव हवी. ही नसेल तर मग बलात्कार, एकतर्फी प्रेम, अॅसिड हल्ला या गोष्टी मागील पानावरून पुढे चालूच राहतील आणि त्यात भर पडेल ती विवाहांतर्गत बलात्काराची.


स्त्री-पुरुष नात्यामध्ये दोघांचीही भूमिका सारखीच महत्त्वाची आहे. लैंगिक स्वास्थ्य टिकवायचं असेल, तर नात्यात मोकळेपणा हवा, स्त्री शरीराबद्दल आदर हवा. तिच्या मनाचाही विचार करायला हवा. तरच नवरा-बायकोचं सुंदर नातं सुंदरच राहील, आणि टिकेल ही.


लैंगिक संबंधातील खासगीपण जपत या प्रश्नाकडे पाहायला हवं आणि त्यासाठी मला वाटतं पुरुषांनीच पुढाकार घ्यावा. त्यांनी थोडं जरी वेगळ्या दृष्टिकोनातून या प्रश्नाकडे पाहिलं, विशेषत: माणुसकीच्या, समजुतीच्या चष्म्यातून तर कुठलाही कायदा करायची गरज पडणार नाही.


Pranali Lanjewar is Student of Humanities SFS College Nagpur

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn