शासकीय कार्यालयामध्ये धूम्रपान बंदीची ऐशी - तैशी !पॉइंटर - धूम्रपान बंदी कायदा धाब्यावर !


मुंबई दि. ३१ मे (प्रतिनिधी)


सिगारेट आणि अन्य तंबाखू उत्पादन कायदा 2003 मधील कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे हा दंडनीय अपराध आहे. शासकीय कार्यालयाचा परिसर, शाळा महाविद्यालय, विद्यापीठ, एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, सरकारी दवाखाने, विश्रामगृहे आदी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान किंवा अन्य तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश असताना खुले आम धूम्रपान करणाऱ्यांवर कुठलेही कडक शासन करत नाही.

तंबाखूच्या किंवा तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने होणाऱ्या दुष्परिणामाची दखल घेऊन शासनाने सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदीचा निर्णय घेतला. मात्र, या कायद्याचे सर्रास उल्लंघन होतांना दिसत आहे.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करताना आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशित करण्यात आले. परंतु हा कायदा केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येते. शहरात बसस्थानकावर अनेकजण खुलेआमपणे बिडी, सिगारेट पिताना दिसतात.

त्यामुळे त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. इतकेच नव्हे यामुळे या परिसरात नियमित व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांच्या आरोग्याला धूम्रपानाचे नाहक दुष्परिणाम भोगावे लागणार आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणेने या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

कायद्यानुसार १८ वर्षाच्या खालील मुलाने तंबाखू किंवा तंबाखुजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई आहे. परंतु पानटपरीवर बसून लहान मुले सर्रास तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करताना दिसत आहे. त्यामुळे अशा दुकानातून त्या मुलांचे समवयस्क मुले त्यांच्याकडून तंबाखुजन्य पदार्थ सहज मिळवितात. प्राथमिक शाळात शिकणाऱ्या लहान मुलामुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शिवाय, शाळकरी मुले-मुली, कामकरी महिला यांच्यासह नोकरशाहीतील कर्मचारी, शिक्षकांसह अनेकजण सार्वजनिक ठिकाणी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करीत असल्याने त्यांचे जीवन धोक्यात आले आहे. जिल्ह्यात खर्रा या तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात असून त्यामुळे अनेकांना तोंडाचे आजारसुद्धा बळावत असल्याचे निदर्शनास येत आहे.

शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयाच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असली तरी त्यांच्या दाराला लागूनच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाची विक्रीचे दुकाने थाटात उभे आहेत. या धूम्रपान करण्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात येत असल्यामुळे त्यामुळे अन्न व प्रशासन विभागाने परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या बंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

 SUpport

Independent Journalism

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved