द कलरबोर्ड डेस्क

आणखी एक उत्कृष्ट निकाल. दहावीच्या परीक्षेत 100 % उत्तीर्ण. मागील वर्षांपासून शाळेने एकूण 90 % पेक्षा जास्त उत्तीर्णता मिळवली आहे. ही कामगिरी कुठल्यातरी शहरी, सर्व सोयीसुविधा असलेल्या नामांकित शाळेची असल्यासारखी वाटते.
परंतु हे रेकॉर्ड आहे शाहू-फुले-आंबेडकर माध्यमिक निवासी आश्रम शाळेचे. खामगाव तालुका, जिल्हा बुलढाणा येथिल लखनवाडा गावामध्ये या शाळेने उपेक्षित समुदाय, ज्यांना वर्षानुवर्षे शिक्षणापासून दूर ठेवले गेले आहे अशा विद्यार्थ्यांमध्ये मोठा विकासात्मक बदल सिद्ध केला आहे.
एकूण 216 विद्यार्थी संख्येसह डोंगराळ भाग व शेतांच्या सानिध्यात वसलेल्या या शाळेने स्थानिक मुलांना वेगळं जीवन उभारण्यासाठी साधन उपलब्ध करुन दिले आहेत। येथे पाचवी ते दहावी पर्यंत वर्ग आहेत.
आदर्श शिक्षण व बहुउद्देशीय विकास संस्था संचालित शाहू- फुले-आंबेडकर एससी / एसटी हॉस्टेल मधील बरेच विद्यार्थी गरीब परिवारामधून येतात. त्यांचे पालक शंभर रुपये दिवस प्रमाणे शेतमजुरीचे काम करतात. म्हणूनच ग्रामीण भागातील या लोकांना शक्य तितके चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने ही शाळा स्थापन करण्यात आली आहे अणि वंचित एससी / एसटी विद्यार्थ्यांच्या उन्नतिकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
कर्मचार्यांची काळजी आणि विद्यार्थ्यांच्या चिकाटीमुळे लाखनवाडा केंद्रातील एसएससी बोर्डामध्ये ते सातत्याने अव्वल ठरले आहेत। ग्रामीण भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या उद्देशाने संस्थेने सुरुवात केली असून या मुलांमध्ये ज्ञान आणि शिक्षणाची ओढ असल्याचे परिणाम स्पष्ट दिसत आहेत.
शाळेतील शिक्षक अणि कर्मचारी सतत विद्यार्थ्यांना आधार देण्यासाठी तत्पर असतात। काही उदार देणगीदारांनी गणवेश, पुस्तके आणि वॉटर प्यूरिफ़ायर इत्यादिसाठी दान केले आहे.

सदर आश्रमशाळा केंद्र सरकारच्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीच्या योजनेअंतर्ग सुरू करण्यात आली. महाराष्ट्रात शिक्षणाची पातळी वाढवली आहे असे कारण देउन, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील आश्रमशाळांना अनुदान दिले नाही. महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने या आश्रम शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर सण 2006 मध्ये मान्यता दिल्या होत्या. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाच्या कायम विनाअनुदानित शाळांना सरकारने अनुदान सुरू केले होते. त्या धर्तीवर राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने आश्रमशाळांना अनुदान देणे अपेक्षित होते. परंतु अतिशय विलंबाने 8 मार्च 2019 रोजी शाहू फुले-आंबेडकर अनुसूचित जाती निवासी शाळा योजना ही नवी योजना तयार करुन सामाजिक न्याय विभागाने 20% अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतला. परंतु अद्याप पात्र शाळांना प्रत्यक्ष अनुदान देण्यात आलेले नाही.
गेल्या चार वर्षांपासून सद्धम्म फाउंडेशन शाळेला विविध प्रकारे मदत करीत आहे. म्हणूनच अशा या होतकरू मुलांच्या उज्वल भविष्यासाठी, व शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेचा वारसा व त्यांनी पेटवलेली शिक्षणाची ज्योत तेवत ठेवण्यासाठी शाहू-फुले-आंबेडकर आश्रमशाळेच्या कार्यास योगदान व आर्थिक मदत करावयाची असल्यास सद्धम्म एज्युकेशन फाऊंडेशन ला संपर्क करता येइल.