सम्राट कनिष्क यांची मूर्तीकला, सुवर्ण नाण व धम्मविषयक अनमोल कार्य

धम्ममित्र सुनिल
बौद्ध साहित्यात सम्राट कनिष्क यांच्या युगाचे एक महत्वपूर्ण स्थान आहे. यांच्याच कार्यकाळात ( इसवी सन ७९ ते इसवी सन १४४- दूसरी शताब्दी) महाकवी भदंत अश्वघोष व आचार्य वसुमित्र होवून गेले आहेत. कुषाण साम्राज्याची राजधानी पुरुषपुर म्हणजेच आजच्या पाकिस्तानातले पेशावर हे होते. तेथून ते काबुल पासुन कश्मीर तथा भारतातील मध्य प्रांतातील नर्मदा नदी पर्यन्त शासन करत असत.


चीन सोबत युद्ध करून सम्राट कनिष्क यांनी काश्गर, खोतान , यारकंद हा भूभाग आपल्या साम्राज्यात सामिल करून घेतला .

सम्राट कनिष्क यांच्याच कार्यकाळात बौद्ध धम्म मध्य आशियात सर्वदुर पसरला होता. ज्या प्रकारे सम्राट अशोक आपल्या नावापूढे देवानप्रिय प्रियदर्शी व राजा मिलिंद आपल्या नावापूढे धम्मराज हे नामाभिमान लावत असत, अगदी त्याचप्रमाने सम्राट कनिष्क आपल्या नाण्यावर ईरानियन तोखारी भाषेत व ग्रीक लिपीत शाओवानोशाओ म्हणजे "राजाओं का राजा " व "देवपुत्र" हे नामाभिमान लावत असे. यांच्याच कार्यकाळात बुद्ध धम्म सर्वप्रथम प्रवेश करून तिथे भदंत काश्यप व भदंत मातंग यांनी पांढरा रंगाच्या अश्वावर (व्हाईट हॉर्स ) सुंदर बुद्धमूर्ति व धम्मग्रंथ नेवून चिन मध्ये बौद्ध धम्माचा प्रसार व प्रचार केला.सम्राट कनिष्क यांनी कनिष्कपुर (आजचे कश्मीर मधील कनिस्पुर ) ह्या ठिकानी चौथी धम्मसंगिती आयोजित केली होती. या धम्म संगितीचे आचार्य वसुमित्र अध्यक्ष व महाकवी भदंत अश्वघोष उपाध्यक्ष होते. धम्मसंगिती संपल्यानंतर सम्राट कनिष्क यांनी कश्मीर हा प्रदेश बौद्ध संघास धम्मदान म्हणून दिले. कनिष्कपुर हे शहर त्यांनी स्वतः च निर्माण केले. त्या ठीकानी एक विशाल स्तूप व एक विशाल विहार निर्माण केला होता, ते महाविहार कनिष्क महाविहार याच नावाने प्रसिद्ध होते. सम्राट कनिष्क यांचे प्राबल्य प्राचीन रेशीम मार्गावर होते. याच मार्गावर जे स्तूप विहार निर्माण झाले त्याचे सर्व श्रेय हे सम्राट कनिष्क यास जाते. चीनी प्रवासी बौद्ध भिक्खू फाहियान व ह्यू एन संग ह्यांनी प्राचीन रेशिम मार्गावरील ह्या स्तुपांचे व विहारांचा उल्लेख त्यांच्या प्रवास वर्णनात केला आहे.सम्राट कनिष्काच्या अगोदर बुद्ध मूर्तीचे निर्माण कार्य झाले नव्हते. या विश्वात प्रथम बुद्धमूर्ति निर्माण करन्याचा मान हा सम्राट कनिष्क यांनाच जातो. त्या अगोदर बोधिवृक्ष, बुद्धपद, स्तूप, वज्रासन, त्रिरत्न ही चिन्ह यांचे वंदन केल्या जात असे. सम्राट कनिष्क याने काही सुवर्ण नाने काढले होते. त्यावर स्वतः ची प्रतिमा त्याने कोरून घेतली होती, दूसरी बाजूवर गौतम बुद्ध यांची मूर्ति कोरली होती. त्यांच्या नाण्यावर ग्रिकांचा प्रभाव दिसून येतो, यांच्याच कार्यकाळात बोधिसत्वांच्या मूर्ति सुद्धा बनवील्या जाऊ लागल्या. हा गांधार मूर्तिकला शैलीचा म्हणजेच इंडो ग्रीक शैलीचा सुवर्णकाळ मानल्या जातो. खालील कार्नेलियन सील व सुवर्ण नाण हे कुषाण साम्राज्याचे सुवर्ण काळाचे उत्तम उदाहरण आहे.


कार्नेलियन सील
कार्नेलियन हा तपकिरी रंगाचा मौल्यवान दगड आहे. हा दगड टणक असुन यामध्ये थोड़े सिलिकाचे प्रमाण असते. हा मौल्यवान दगड आपनास इंडोनेशिया, ब्राझिल, भारत, सैबेरिया व जर्मनी येथे सापडतात. ऐसेरियन साम्राज्यात आपनास ह्या कार्नेलियन सिलचा वापर झालेला आपनास आढ़ळतो. भारताचा विचार केल्यास कुषाण साम्राज्या सम्राट कनिष्क यांनी या कार्नेलियन सिल चा वापर केलेला आहे. वर चित्रात जे सिल दाखविले आहे ते कुषाण साम्राज्याचे कार्नेलियन सिल असुन, यामध्ये एक ईराणियन देवता Adsho हे घोड्यावर बसलेले दाखविले आहेत . ते Adsho हे नाव ग्रीक लेटर्स मध्ये लीहिलेले आहे .


घोड्याच्या शेपटिच्या वरच्या बाजूस आपनास बुद्ध, धम्म व संघ दर्शवीनारे बुद्ध धम्मातील पवित्र असे त्रिरत्न चिन्ह दाखविले आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुषाण साम्राज्यातिल सम्राट कनिष्क यांचे घोड्याच्या समोर कोरलेले जे चिन्ह आपनास दिसत ते त्यांच्या साम्राज्याचे राजचिन्ह ( Royal Symbol of Kushan Dynasty) आहे.दुसऱ्या फोटोत आपनास सम्राट कनिष्क यांचे सुवर्ण नाण दिसत आहे, यात स्वतः एका बाजूने सम्राट कनिष्क दिसत आहेत, दूसरी बाजू मध्ये गौतम बुद्ध कोरलेले आहेत. यात ग्रीक अक्षरात गौतम बुद्ध यांच्या उजव्या बाजूस बोद्दो असे लीहिले आहे. ग्रीक भाषामध्ये बुद्धास बोद्दो असेच संबोधले जात असे, यावर हेलेनिस्टिक शैलीचा प्रभाव आहे.


गौतम बुद्ध यांच्या डाव्या बाजूस कुषाण साम्राज्याचे राजचिन्ह दर्शविन्यात आले आहे. पाकिस्तान व अफगानीस्तान सीमा प्रांतात तथागत गौतम बुद्ध यांना बुद असे म्हणत असत. या शब्दात ध हे सायलेंट आहे, कारण फोनेटीकली त्या लोकांचा उच्चार तसा येत असतो.लेखक धम्ममित्र सुनिल

हे महाराष्ट्र शासन अंगीकृत महावितरण मध्ये ऑपरेटर या पदावर कार्यरत असुन धम्मलिपीचे अभ्यासक व प्रचारक आहेत

जि. सोलापुर

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn