- मिलिंद जाधव

दीड दिवस शाळेत गेले
प्रबोधन समाजामध्ये केले
साहित्य सातासमुद्रापार गेले
परिवर्तनाच लोकशाहीराचं गाणं
साहित्य रत्नाची खान
अण्णाभाऊ साठे महान
रशियाचा केला प्रवास
साहित्याचा लाभला सहवास
प्रबोधनाचा तुम्हाला ध्यास
लोककलेतून जोडला समाज
साहित्य रत्नाची खान
अण्णाभाऊ साठे महान
गाण्या, पोवाड्या मधून
समतेचा संदेश दिला
इतिहासामधी नाव रंगून गेला
साहित्यात तुमचा सन्मान
साहित्य रत्नाची खान
अण्णाभाऊ साठे महान
कामगारांसाठी गाळला घाम
तुमच्या कार्याला माझा सलाम
न्याय, हक्कासाठी लढले जोमानं
मिलिंद गातो तुमचं गुणगाण
साहित्य रत्नाची खान
अण्णाभाऊ साठे महान
कवी मिलिंद जाधव हे ठाणे येथे पत्रकार आहेत.