हिंगोली मधिल सेनगावमध्ये केला जातोय दूषित पाणीपुरवठा

नागरिकांचे आरोग्य धोक्यात. सेनगाव नगरपंचायतचा भोंगळ कारभार.


विट्ठल देशमुख / Vitthal Deshmukh

Sengaon Dist। Hingoli


एकीकडे कोरोनाचा संकट आहे तर हिंगोली मधल्या सेनगाव शहरात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांना साथीच्या रोगाचा सामना करावा लागत आहे. येलदरी धरणातून सेनगाव करांना दूषित पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे सेनगाव नगरपंचायतचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेष म्हणजे सध्या जगभरात कोरोना सारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले असून हिंगोली मध्ये कोरोना चे पंधरा रुग्ण पॉझिटिव्ह आहेत याच पार्श्वभूमीवर सेनगाव शहरात गेल्या आठवडाभरापासून येलदरी धरणातून दूषित पाणीपुरवठा सुरू आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आली असून याकडे नगरपंचायत प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे तसेच ही पाईपलाईन जागोजागी लिकीज होत असल्याने व फिल्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड निर्माण होऊन हे पाणी दूषित येत असल्याचा संशय नागरिकातून व्यक्त केला जात आहे त्यामुळे ही पाईपलाईन अत्यंत निकृष्ट दर्जाची झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे दूषित पाणीपुरवठा करून सेनगाव करांच्या आरोग्याची खेळ सुरू आहे. याकडे वरिष्ठांनी वेळीच लक्ष देऊन या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर योग्य अशी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सेनगाव शहरातील नागरिकांतून केली जात आहे.


 SUpport

Independent Journalism

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved