आई

By मिलिंद जाधव/Milind Jadav

मायेने साद घालणारी काळजाच्या तुकड्या सारखं नेहमीच जीवापाड जपणारी  पाळण्यात अंगाई गाणारी जिच्या हृदयात प्रेम लपलेलं असते  ती फक्त आई असते  नऊ महिने गर्भात ठेवणारी  वडिलांच नाव देणारी आपल्या मुलांना चांगली  झोप लागावी म्हणून  रात्रभर उशाला जागणारी जी असते   ती फक्त आई असते  स्वतः उपाशी राहून  मुलांना पोटभर घास  भरवणारी मुलांच्या उद्याच्या भविष्याची सतत काळजी करणारी  मनात वेदना सोसणारी असते ती फक्त आई असते  पायाला ठेस आपल्या लागते  आणि वेदना मात्र तीला होतात  जिच्या डोळ्यांत पाणी येते  आपल्यासाठी अश्रूची मोठी  किंमत मोजत असते  ती फक्त आई असते  आपल्या सुखासाठी  दिवसरात्र कष्ट करणारी उनाचे  चटके सोसत फिरणारी  जिचा आशिर्वाद सातासमुद्राच्या   पार आणि अजरामर असते  ती फक्त आई असते  लहानाच मोठ करून हाताला धरून चालायला शिकवलं लहान मोठ्यांचं आदर  करायला शिकवलं जिच्या मायेनं दगडालाही पाझर फुटत  असते  ती फक्त आई असते 

Author Milind Jadav is a journalist from Padgha, Thane

 Support Independent Journalism

  • LinkedIn
  • Instagram
  • Twitter
  • Facebook

Support

Independent Journalism

© The Colourboard 2020. All Rights Reserved

Screen Shot 2020-11-22 at 12.24.18 PM.pn